शरद पवारांचा वाढदिवस, तर स्व.मुडेंच्या जयंतीनिमित्ताने रुग्णालयात फळ, बेडशीट वाटप
👉आ.रोहित पवारांच्या नागपूर येथील संवाद यात्रेच्या समारोपासाठी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातून 300 कार्यकर्ते नागपूरकडे रवाना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ व बेडशीटचे वाटप केले. त्यापूर्वी हिंद वसतिगृह येथे सूर्य स्व.मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.ॲड.ढाकणे म्हणाले स्व. मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात जनसामान्यांसाठी अतिशय संघर्ष करून राजकीय जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण राजकीय हयात या घटकासाठी अर्पित केली.
तसेच शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र पुरोगामी विचार रुजवत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अमूल्य असे योगदान देत आले आहेत आजच्या बदलत्या परिस्थितीतही श्री.पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी सर्व समावेशक धोरण राबवून आपल्या राजकीय विचारांची कधीही तडजोड केली नाही. आज निर्माण झालेली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अतिशय विदारक असून त्यासाठी शरद पवार यांच्या दूरगामी पुरोगामी विचारांची खऱ्या अर्थाने गरज असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच आजपर्यंत महाराष्ट्र नेहमी प्रगतीपथावर राहिला आहे आणि अशीच प्रगती राखण्यासाठी त्यांच्या ध्येय धोरणांना पाठबळ देण्याची आजची नितांत गरज आहे.
तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, गहिनीनाथ शिरसाट, चंद्रकांत भापकर, वृद्धेश्वर कंठाळी, उद्धव दुसूंग, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाशिर शेख, दिगंबर गाडे, वैभव दहिफळे, राजेंद्र खेडकर, अतिश निराळी, योगेश रासने आधी उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्या नागपूर येथे होत असलेल्या संवाद यात्रेच्या समारोपासाठी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सुमारे 300 कार्यकर्ते नागपूरकडे रवाना करण्यात आला.