“गल्ली ते दिल्ली दूषित झालेल्या राजकारणातील एक स्वच्छ मनाचा नेता…प्रताप ढाकणे”…. ! : उध्दव दुसंग

“गल्ली ते दिल्ली दूषित झालेल्या राजकारणातील एक स्वच्छ मनाचा नेता…प्रताप ढाकणे”…. ! : उध्दव दुसंग
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
आजचे गल्ली ते दिल्ली राजकीय परिस्थिती बघीतली तर, राजकारण हे क्षेत्र खऱ्या, संवेदनशील मनाच्या माणसाचे राहीले नाही अस अनेकांना वाटते.. आणि ते खरे आहे… आजची परिस्थितीच तशी आहे. पण अशाही परिस्थितीत एक स्वच्छ मनाचा राजकीय नेता आपला राजकीय, सामाजिक संघर्ष करतोय…आणि का… तर तो आपल्या फाटक्या तुटक्या माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी…

राजकारणातला, वैचारिक दर्जा ठेऊन..आणि हो विचार हे फक्त बोलण्यापुरते,भाषण करण्यापुरते न ठेवता ते कृतीत आणून अंगीकार करणारे प्रताप ढाकणे हे एक वेगळेच व्यक्तीमत्व…
आपले वडील स्व.बबनराव ढाकणे यांचा समाजकारणाचा,राजकारणाचा वारसा प्रताप ढाकणे चालवतात. स्व.बबनराव ढाकणे साहेब यांनी आयुष्यभर राजकारण करताना एक नैतिकता, वैचारिक वारसा जपला… काल परवा आपण विधानसभेच्या अधिवेशनात शोकप्रस्ताव बघितला असेल.. तेव्हाआपल्या लक्षात आले असेल की स्व.ढाकणे साहेबांनी उपभोगलेली पदे वाचताना …..विधानसभा अध्यक्ष मा.राहुलजी नार्वेकर साहेब यांना अक्षरशः दम लागला होता…


स्व.ढाकणे साहेब यांनी कुठलीही राजकीय पार्शभुमी नसताना आयुष्यभर फाटक्या, तुटक्या वंचीत घटकासाठी काम करत गल्ली ते दिल्ली असा संघर्षमय राजकीय प्रवास केला…
प्रताप ढाकणे ही आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून समाजकारण, राजकारण करत असताना समाजातील शेवटच्या घटकाला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतात… खरतर , आजची पिढी ही सुशिक्षित पिढी माणली जाते..


आज शोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रताप ढाकणे यांचे महाराष्ट्रभर चाहते झाले.आपल्या सडेतोड आणि प्रखर विचाराने प्रताप ढाकणे महाराष्ट्राचे प्रतापकाका झाले…काकांच्या वैचारिकतेचे अनेक किस्से आपण ऐकले…काकांच्या संवेदनशील मनाचे ही आपल्याला अनेकदा दर्शन घडले…तीन विधानसभा निवडणुकीत अत्यंत अल्पमताने पराभुत होऊन सामान्य “जनतेच्या मनातील आमदार काका” आहेत. काका हा रस्त्यावरचा पुढारी आहे… आजच्या गढुळ राजकीय परिस्थितीत काकांच्या स्वच्छ मनाचे पुन्हा दर्शन घडले…किस्सा ही अगदी शोशल मिडीयाच्या माध्यमातुन जिल्ह्याने बघितला… स्व.बबनराव ढाकणे साहेब यांच्या निधनानंतर बाहेर पडलेले काका आज प्रत्येक सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनता , यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहेत.
आज काकाचे गाव असलेले अकोला (ता.पाथर्डी) येथील काही दुखःद घटनेच्या भेटीप्रसंगी काका बरोबर गेलो…काकांबरोबर गावात गेलो असताना.. गावात जरा गर्दी दिसली. विचारले असता समजले की , खासदार सुजय विखे पाटील येणार आहेत… तेथून पुढे जात काकांनी अनेक वस्तीवर जात गाठीभेटी घेतल्या. पुन्हा गावात आल्यावर गावात खासदार आणि आमदाराचा कार्यक्रम चालू दिसला…. लगेच काकांनी गाडी थांबवायची सांगितली.अचानक सर्वजण गडबडले. काका गाडीतून उतरत मला चांगल्या दोन शाली घे म्हणून सांगितले…. आणि अचानक कार्यक्रमस्थळी जात , खा.विखे पाटील आणि आमदार राजळे मॅडम यांचा सन्मान केला…
ही गोष्ट सर्वानाच शाॅकिंग होती… खासदार आपल्या गावात आले. आमदार आले, एक ग्रामस्थ म्हणून त्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे… असे समजून स्वागत केले. हे खूप मोठ्या मनाचे लक्षण आहे.


राजकीय विचार भिन्न असले तरी, ” अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे”. यातून काकांनी आपले वडील स्व.बबनराव ढाकणे यांच्या विचाराचे आपण पाईक आहोत हे कृतीतून दाखवून दिले.
लोकसभा निवडणुकीत मा.खा.जेष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर खा.गडाख साहेब यांचा पहिला सन्मान स्व.ढाकणे साहेब यांनी केला होता. स्व.ढाकणे साहेब यांनी पाथर्डी तालुक्याला विज मिळावी म्हणून विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारली होती… नाईक साहेब पाथर्डीला न्याय द्या, अशी पत्रके विधानसभेत भिरकावली होती. स्व.वसंतराव नाईक साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते.या कृतीमुळे साहेबांना तुरूंगात टाकले गेले…स्व. ढाकणे साहेब तुरूंगातून सुटुन पाथर्डीला येई पर्यंत तालुक्यात विजेचे खांब येऊन पडले. त्याच वसंतराव नाईक साहेबांचा जिवंतपणी पुतळा स्व.ढाकणे साहेबांनी पाथर्डीत चौकात उभा केला हा इतिहास आहे….(आता राजकारण बघितले तर ही गोष्ट खरी वाटत नाही)


हेच संस्कार काकांवरती आहेत. आजच्या गढुळ राजकीय वातावरणात काका आपले संस्कार कृतीतून नेहमीच दाखवतात….राजकारणातील हे औदार्य खरोखरच आज सर्वानी दाखवण्याची गरज आहे..राजकारण फक्त निवडणुकीच्या पुरते करावे.म्हणणारे पुढारी कायम राजकीय सुडबुध्दीने वागतात.पण काका यातून सर्वांगाने एक वेगळा माणूस…पण काका कधी कधी अस वाटत या चांगुलपणाने तुम्हाला काय दिले…? आजपर्यंत तुमच्यातल्या या वैचारिक गुणवत्तेला सत्तेच्या माध्यमातून संधी नाही भेटली हे खर तर तुमच्यापेक्षा जनतेचे दुर्भाग्य…पण जाऊ द्या काका…परमेश्वराने ही तुमचा खूप अंत पाहिलाय जेव्हा तो तुम्हाला देईल तेव्हा व्याजासह दिल्याशिवाय राहणार नाही…तुमच्यातल्या अशा संवेदनशील समय सुचकतेने कृतीने तुमच्या विषयीचा आदरभाव दुप्पट झाला.असो अशा परिस्थितीत स्वतःचा चांगुलपणा टिकवून ठेवणाऱ्या तुमच्या व्यक्तीमत्वाला पुनःश सलाम…🙏

🙏तुमचाच एक चाहता…✍️
उध्दव दुसंग ९९२१७१५४८८

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!