नगरातील दोन गटातील धुमश्चक्रीतील ८ जण ताब्यात ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई

नगरातील दोन गटातील धुमश्चक्रीतील ८ जण ताब्यात ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : नगर शहरात दोन गटातील वादावरुन एकमेकांवर कोयत्याने हल्ला करणा-या ८ जणांना ‘नगर एलसीबी’ने ताब्यात घेतले आहे.‌ यामध्ये एक अल्पवयीन आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राजवळील भाजपाच्या बुथजवळ थांबलेला असल्याच्या कारणावरुन दि.१८ मे २०२४ रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी आदेश किसन भिंगारदिवे, संकेत किसन भिंगारदिवे, जमीर पठाण, सोन्या लांडगे, रोहित जाधव, पंकज दराडे व त्यांच्यासोबत असलेले इतर अनोळखी ४ ते ५ साथीदारांनी लाकडी दांडके, कोयत्याने मला व सोबत असलेल्या मित्रांना मारहाण केली आहे, या चेतन संतोष सरोदे (वय १८, रा. भिम चौक, गांधीनगर, बोल्हेगांव, ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पो. ठाण्यात गु.र.नं. ६१९/२०२४भादवि कलम ३०७,१४३,१४७,१४८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच पंकज मच्छिंद्र दराडे याला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने तो त्याचे मित्रासह गावडे किराणा दुकानासमोर जाऊन आरोपी आशिष विठ्ठल शिरसाठ, चेतन संतोष सरोदे, योगेश संतोष सरोदे, शारुन दाऊद जाधव, यश रावसाहेब शिरसाठ यांना तुम्ही मारहाण का केली, याबाबत विचारणा केला असता त्यांनी मला व मित्रांना लाकडी दांडके, कोयत्याने मारहाण केली आहे, या आदेश किसन भिंगारदिवे (वय २०, रा. गांधी नगर, भिंगारदिवे मळा, ता. जि. अहमदनगर) याच्या फिर्यादीवरून
तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. ६१८/२०२४ भादवि कलम ३२४,३२३,५०४,१४३,१४७,१४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गंभीर स्वरुपाची असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने एसपी राकेश ओला यांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात यांना आदेश दिलेले होते. आदेशान्वये सपोनि हेमंत थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, विशाल दळवी, सचिन अडबल, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे, उमाकांत गावडे, अरुण मोरे असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन स्वतंत्र पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. एलसीबी टिम’ने
जिल्हा रुग्णालय अहमदनगर, मॅक्सकेअर हॉस्पिटल अहमदनगर येथे ॲडमिट असलेल्या फिर्यादींना भेटून, गुन्ह्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. त्यानंतर माहितीनुसार अनोळखी आरोपींचे पूर्ण नांव पत्ते निष्पन्न केले. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर लागलीच फोन बंद करुन पळून गेलेले होते. आरोपींचे वास्तव्याची माहिती काढून तोफखाना पो. ठाणे गु.र.नं. ६१९/२०२४ भादवि कलम ३०७ वगैरे या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक उर्फ सोन्या राजेंद्र लांडगे (वय २२),: संकेत किसनराव भिंगारदिवे (वय २२), जमीर शौकत पठाण (वय२०), ओमकार सतिष आपरे (वय २१, सर्व रा. गांधीनगर, अहमदनगर), परमेश्वर हरिभाऊ मगर (वय२१, रा. बोल्हेगांव, ता. जि. अहमदनगर) यांना तसेच तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. ६१८/२०२४ भादवि कलम ३२४ वगैरे या गुन्ह्यातील आरोपी थॉमस उर्फ योगेश संतोष सरोदे (वय २३), यश रावसाहेब शिरसाठ (वय १९, रा. गांधीनगर, मोरया पार्क, अहमदनगर), एक अल्पवयीन यांना अहमदनगर शहरामधून विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले. पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!