कांबी येथे भुमीपूत्रांचा सन्मान सोहळा उत्साहात

कांबी येथे भुमीपूत्रांचा सन्मान सोहळा उत्साहात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील कांबी येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींना रविवारी ( दि. १९) ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. गावातील हनुमान मंदीरात रविवारी सकाळी हा सन्मान सोहळा उत्साहात झाला.
सन्मानित करण्यात आलेल्या गावातील भुमिपुत्रा मध्ये प्रा.भागवत डुकरे (पीएचडी), हरिद्वार अप्पासाहेब म्हस्के (एमबीबीएस), प्राजक्ता सुरेश पिसे (एमबीबीएस), धनश्री भगवान राजपूत (सीए), गौरव जीवनसिंग राजपूत (बीएएमएस), चंचल उद्धव जाधव (बीएएमएस), वैष्णवी दत्तात्रय थोरात (बीएएमएस), स्नेहल राजेंद्र खोसे (बीएएमएस), दत्तात्रय बाबासाहेब होटकर (बीएएमएस), वैभव ज्ञानेश्वर म्हस्के (बीएएमएस),साक्षी थोरात (बीएएमएस) अंकिता डिगंबर म्हस्के (बीएचएमएस), सानिया शेख (बीएचएमएस), कासिम शेख (बीडीएस), सायली राजपूत (एम.फार्म), प्रांजल नंदकिशोर म्हस्के (१० वी सीबीएसई, गुण ९७.४ टक्के) गणेश डमाळ, नवनाथ थोरात, सचिन गावडे, महादेव गोयकर या पोलिस खात्यात भरती झालेल्या तरुणांना या वेळी सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी बोधेगाव येथील डॉ. प्रमोद जाधव, डॉ. अरुण भिसे, डॉ. दीपक जैन, डॉ. सतीश मनचुके, डॉ. निखिल जगताप, डॉ. धारकर, आदी मान्यवर उपस्थित होते.कांबी गावचे सरपंच  नितीश पारनेरे, उपसरपंच सुनील राजपूत यांनी यशस्वी युवक युवतींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नंदकिशोर म्हस्के यांनी केले.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गावातील तरुण तरुणींना शाबासकीची थाप म्हणून व गावातील इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पासून प्रेरणा घ्यावी म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने त्यांना वेळोवेळी गौरविण्यात येते, गावातील विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, ग्रामस्थ म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो”
सरपंच नितीश पारनेरे,(कांबी ता शेवगाव)

संकलन: निलेश ढाकणे, शेवगाव 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!