ऑनलाईन न्य्ाूज नेटवर्क
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
देहरादून – इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने बुधवारी योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर 1000 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. असोसिएशनने हा खटला रामदेव बाबा यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे दाखल केला आहे, ज्यामध्ये बाबा अॅलोपॅथीला कचरा आणि दिवाळखोर विज्ञान म्हणत आहेत.त्याचबरोबर IMA च्या राष्ट्रीय युनिटने या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की पतंजलीचे मालक रामदेव यांच्या लसीकरणावर चुकीची माहिती देण्यावर बंद घातली पाहिजे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केला आहे की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही 10,000 डॉक्टर आणि लाखो लोक मरण पावले आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालवला पाहिजे.