स्व: बबनराव ढाकणे साहेबांना चिंचपूर इजदे, विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे साहेबांना चिंचपूर इजदे व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य वसंतराव खेडकर, सरपंच विष्णू अण्णा खेडकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत खेडकर, शिवसेना तालुका उपप्रमुख केशव बाबुराव खेडकर, कांग्रेस तालुका संघटक बबन तुकाराम खेडकर ,अॕड. उद्धव खेडकर आदी वक्त्यांनी त्यांनी ढाकणे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
चिंचपूर इजदे परिसरात तलाव,पूल, व्यायाम शाळा, विद्युत उपकेंद्र इत्यादींच्या उभारणीत ढाकणे साहेबांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बबनराव ढाकणे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेन असे प्रतिपादन वसंतभाऊ खेडकर यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नागरगोजे, सरपंच ज्ञानेश्वर खेडकर, ग्रामपंचायत सदस्य योहान खंडागळे, भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब खेडकर सर, बाळासाहेब भानुदास खेडकर, विजय मिसाळ, अंबादास कंठाळे, रामनाथ गायकवाड, बाबासाहेब खेडकर पाटील, संजयतात्या खेडकर इत्यादींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.