सेवानिवृत्त पोलीस व अधिकाऱ्यांचे समाजात कर्तव्यदक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य-राकेश ओला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महाराष्ट्र पोलीस व अहमदनगर पोलीस दलातर्फे निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करतो. आपण आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ पोलीस दलातील सेवेसाठी दिला आहे. सेवा निवृत्तीनंतर परिवारासाठी वेळ देणे आवश्यक आहे.नोकरी करत असताना बऱ्याच गोष्टी राहून गेले असे वाटते. प्रत्येकाने काहीतरी छंद जोपासावा, देवदर्शनासाठी जावे, समाजासाठी वेळ द्यावा,तसेच समाज सेवा करावी.स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पोलीस दलात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपण समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य केले आहे.असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सेवानिवृत्त डिवायएसपी संजय काशिनाथ सातव, पीएसआय संजय निवृत्ती धीवर, महादेव राधाजी शिंदे, राजेश काशिनाथ गायकवाड, राजेंद्र एकनाथ गायकवाड, बाळासाहेब भानुदास दिवटे, सफौ.रमेश रघुनाथ गुंजाळ, पोहेकॉ. नाथु सुखदेव कळमकर आदींचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव, पो.नि.कऱ्हे , पो.नि. प्रताप दराडे, मानव संसाधन विभागाचे स.पो.नि. सचिन बागुल, पोसई दत्तात्रय हुलगुंडे, पोहेकॉ प्रांजली खामकर आदी उपस्थित होते.