संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या हैदरपुरामधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलातील आणि दहशवाद्यांचा चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारले. संध्याकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. मग काही वेळानंतर सुरक्षा दलाने एका अज्ञात दहशतवाद्याला ठार मारले. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. यापूर्वी गुरुवारी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते.
माहितीनुसार आतापर्यंत १३० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. खोऱ्यात ३८ परदेशांसह १५०-२०० दहशतवादी सक्रीय आहेत. काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका सेल्समॅनची हत्या केली होती. याच्या एक दिवसापूर्वी ७ नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलची गोळी झाडून हत्या केली होती. तर ऑक्टोबरमध्ये दहशतवाद्यांनी १३ नागरिकांची हत्या केली होती. यामध्ये व्यावसायिक, मजूर, शिक्षक यांचा समावेश होता. ऑक्टोबरमध्ये दहशतवादी हल्लांमध्ये १२ जवान शहीद झाले होते. तर सुरक्षा दलाने २० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.