सुंगधीत तंबाखू, गुटख्यासह २४ लाखांचा मुद्देमाल : ५ जण ताब्यात ; एलसीबी टिम’ची मोठी कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
अहमदनगर : कुलर दाखवून सुंगधीत तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या पाचजणांना पकडण्यात आले आहे. याच्या ताब्यातून २४ लाख २९ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अविनाश आण्णा कमलाकर (वय ३२), प्रमोद सदाशिव भोरे (वय ३८, दोन्ही रा. हातकंणगले, जिल्हा कोल्हापूर), संदीप गोरक्षनाथ शिंगवान (वय ३१), सागर रमेश नाईकवाडे (वय १९), संदीप शिवाजी वाळुंज (वय २७, तिन्ही रा. धामणगांव, ता. अकोले) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश पाटील (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापुर), शुभम चेंडके (रा. शिराळ, जि कोल्हापुर), सनि ऊर्फ सुनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले) अशी फरार झालेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोना विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोकॉ रणजीत जाधव, रोहित मिसाळ व शिवाजी ढाकणे आदिंच्या टिम’ने ही मोठी कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने माहिती ठिकाणी जाऊन सापळा लावला, या दरम्यान काही वेळेत ब्राम्हणवाडा गावाकडून पांढरे रंगाची पिकअप गाडी रोडवर येऊन थांबली. त्यावेळी ब्राम्हणवाडा गावाकडून एक सुझूकी कंपनीची इको गाडी येऊन पिकअप जवळ थांबली. दोन्ही वाहनातील लोकांनी पिकअप गाडीतून गोण्या काढून इको गाडीत ठेवताना दिसले. एलसीबी टिम’ची खात्री होताच अचानक त्यांचेवर छापा घालून काहींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना पोलीसांची ओळख सांगितली. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता, अविनाश आण्णा कमलाकर, प्रमोद सदाशिव भोरे (दोघे रा. हातकंणगले, जि. कोल्हापुर), संदीप गोरक्षनाथ शिंगवान, सागर रमेश नाईकवाडे, संदीप शिवाजी वाळुंज ( तिघे रा. धामणगांव, ता. अकोले) असे सांगितले. एलसीबी टिम’ने पांढरे रंगाचे पिकअप वाहनाची पाहाणी करता कुलर उभे करुन त्या पाठीमागे व इको गाडीत गोण्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुंगधीत सुपारी व गुटखा पानमसाला मिळून आला. त्याबाबत आरोपींकडे विचारपुस करता त्यांनी माल हा पळून गेलेले प्रकाश पाटील (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापुर) व शुभम चेंडके (रा. शिराळ, जि. कोल्हापुर) यांनी विक्री करीता पाठविला असल्याचे सांगितले. ईको गाडीतील सुंगधीत तंबाखु व पानमसाल्याबाबत विचारपुस करता आरोपींनी फरार असणारा सनि ऊर्फ सुनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले ) यांच्या सांगण्यावरुन माल घेण्यासाठी आल्याचे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला व सुंगधित तंबाखू, महिंद्रा पिकअप, सुझूकी कंपनीची ईको कार, ६ सिंफनी कुलर, विविध कंपनीचे ५ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण २४ लाख २९ हजार ९९४ रु. किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेऊन घारगांव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४८२/२०२३ भादविक ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगांव पोलिस करीत आहे.