सावेडी नाका येथे ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनेची स्थापन ; आ.संग्राम जगतापांच्या हस्ते फलकाचे अनावरण

सावेडी नाका येथे ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनेची स्थापन ; आ.संग्राम जगतापांच्या हस्ते फलकाचे अनावरण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगरलोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेची स्थापना होऊन संघटनेच्या फलकाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, लोकराज्य ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे, ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सितारामजी खाकाळ, जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद लखापती, शाखाप्रमुख गजू दंडवते, सल्लागार विष्णू काळे, शाखा उपाध्यक्ष विठ्ठल बारस्कर, सहसचिव शिवाजी शिंदे, सदस्य मच्छिंद्र शिंदे , बाबा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.


उद्घाटन प्रसंगी आमदार जगताप म्हणाले रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे यांचा समाजसेवेत मोठा वाटा आहे. आज सावेडी नाका येथे रिक्षा संघटना स्थापन केली. प्रत्येक रिक्षा चालक यांना खूप अनेक अडचणी असतात‌. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावेळी अडचणी दूर करण्यासाठी एक संघटना हवी असते . यावेळी रामराजे शिंदे यांनी प्रत्येक वेळी लोकांच्या अडी-अडचणीनां मदतीला धावून जातात. आज संघटनेच्या माध्यमातून अडचणी सोडविल्या जातात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!