संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- राहाता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेड़कर यांची जयंती उत्साहात पार पडली. यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे पा., संतोष आगलावे पा. विकास जपे पा., संतोष गायकवाड, प्रदीप नितनवरे व भिम संघर्ष तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी सरपंच रूपालीताई आगलावे पा. यांचा सत्कार श्रीमती सुनीताताई लिहिणार, प्रितीताई व समाजसेविका रखमाई मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच भगवान महावीर जयंतीनिमित्ताने सावळीविहीर बु!!च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ रुपालीताई आगलावे व संतोष आगलावे पा. यांचा सत्कार जैनतीर्थ कमिटीतर्फे करण्यात आला.
उपसभापती बाळासाहेब जपे पा., सरपंच सौ रुपालीताई आगलावे यांच्यासह भिम संघर्ष तरुण मंडळाच्या पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त केले.