सारिका हंगे खून प्रकरण : आरोपी नामदेव बडेच्या जामीन अर्जावर गुरुवारी संभाजीनगर खंडपीठात सुनावणी

  1. सारिका हंगे खून प्रकरण : आरोपी नामदेव बडेच्या जामीन अर्जावर गुरुवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी
    Nagar Reporter
    Online news Natwork
    पाथर्डी : तालुक्यातील येळी येथे शेतीच्या वादातून झालेल्या सारिका हंगे‌ खून प्रकरणी अटक आरोपी चुलत भाऊ नामदेव अंबादास बडे याच्या जामीन अर्जावर गुरुवारी दि.१९ ऑक्टोबरला संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार आहे. या जामिनावर न्यायालयाने सरकारी वकील व पोलिसांना म्हणणे मागितले आहे.


यापूर्वी आरोपी चुलत भाऊ नामदेव अंबादास बडे याचा अहमदनगर जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी आरोपीच्या वकीलाने जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर शनिवारी (दि.७ ऑक्टोबर) ला सुनावणी झाली. या दरम्यान आरोपी चुलत भाऊ नामदेव बडे याच्या जामीन अर्जावर हरकत घेत, अहमदनगर न्यायालयात फिर्यादी कविता घुगे हिने आरोपींपासून  आमच्या कुटुंबाला जीवितचा धोका असल्याने आरोपीला न्यायालयाने जामीन देऊ नये. या अर्जाची न्यायालयाने दखल घेत, आरोपी चुलत भाऊ नामदेव बडे याचा अहमदनगर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आरोपी नामदेव बडे याला जामीन मिळण्यासाठी आरोपीच्या वकीलानी मंगळवारी दि.१० ऑक्टोबरला औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवारी (दि.१९ ऑक्टोबर)ला संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी यापूर्वी फिर्यादी कविता शरद घुगे हिचा पाथर्डी न्यायालयासमोर इनकॅमेरा जबाब घेण्यात आले आहे.
रविवारी (दि.२८ मे २०२३) मध्यरात्री शेतीच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील येळी येथील रामकिसन बडे यांचे कुटुंब घरासमोरील पडवीत झोपलेले असताना झोपितच आरोपी चुलत भाऊ नामदेव अंबादास बडे व आरोपी नामदेव बडे याचा भाचा अतुल पोपट फुंदे या आरोपींनी रामकिसन कारभारी बडे यांची मुलगी ज्या मुलीला १३ वर्षाचा मुलगा व ६ महिन्याचे बाळ आहे. ते बाळ घेऊन झोपलेल्या अवस्थेत सारिका बापू हंगे हिच्या व पत्नी लताबाई रामकिसन बडे या दोघींच्या डोक्यात निर्दयीपणे कु-हाडीने मारुन गंभीर जखमी केले. तर मुलगी कविता घुगे हिच्या पायावर कु-हाड मारली होती. या घटनेत गंभीर जखमी असणारी सारिका बापू हंगे व लताबाई रामकिसन बडे यांना पाथर्डी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अहमदनगरच्या मॅक्सकेअर या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान सारिका बापू हंगे हिच्या डोक्याला गंभीर घाव लागल्याने ती मयत झाली. या घटनेनंतर आरोपींवर ३०२ चा वाढीव कलम पोलिसांनी लावला.
या घटनेतील सारिका हंगे खून प्रकरणी व लताबाई रामकिसन बडे यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक असणा-या आरोपीला आरोपींच्या वकीलाने न्यायालयासमोर जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो जामीन अर्ज घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाथर्डी व अहमदनगर जिल्हा न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अहमदनगर न्यायालयाने आरोपी नामदेव बडे याचा जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपी बडे याला जामीन मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी दि.१० ऑक्टोबरला जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर गुरुवारी दि.१९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
यापूर्वी मयत सारिका बापू हंगे हिची बहिण तथा फिर्यादी कविता शरद घुगे हिचा इनकॅमेरा पाथर्डी न्यायालयासमोर जबाब नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!