संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः सारसनगर मधील मडक्या धुमाळ याला दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलीसांनी केली आहे. एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे, सफौ कैलास सोनार, पोहेकॉ संदीप घोडके, पोहेकॉ दहीफळे, पोना दिपक शिंदे, पोकॉ अमोल आव्हाड, पोकॉ अविनाश कराळे आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
भिंगार पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांनी मडक्या उर्फ शुभम मारुती धुमाळ (रा त्रिमूर्तीचौक सारसनगर ता जि अहमदनगर) याच्याविरूद्ध नगर प्रांतधिकारी यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता. नगर प्रांतधिकारी सुधीर पाटील यांनी हद्दपार आदेश पारीत केल्याने मडक्या उर्फ शुभम मारुती धुमाळ याला अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश भिंगार कॅम्प पोलीसांना प्राप्त झाला. त्यानुसार मडक्या उर्फ शुभम मारुती धुमाळ अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले बाबतच्या आदेशाची बजावणी करण्यात आले. तसा अहवाल वरिष्ठ पोिलिस अधिकार्यांना भिंगार पोलिसांनी पाठविण्यात आला आहे.