सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडताना निलेश लंकेंना पाहिले : माजीमंत्री पाटील

 

सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडताना निलेश लंकेंना पाहिले : माजीमंत्री पाटील
पाथर्डीत मोहटागडावर महाविकास आघाडीचे नगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडताना पाहिले आहे. ते प्रश्न मांडयाचे असेल तर सामान्य माणसात मिसळण्याची कला ही निलेश लंके यांच्यामध्ये असून, ती कला दुसऱ्या कुणातही नाही, विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख टाळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे नेते तथा माजीमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले.
पाथर्डी तालुक्यातील मोहटागडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तथा महाविकास आघाडीचे नगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे, शिवसेनेचे नेते तथा खा.संजय राऊत, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे दादासाहेब फाळके, शिवसेनेचे प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे आदिंसह काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभेचे नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके म्हणाले, मला संधी दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल व त्यानंतरची निवडणुकीची धामधूम या काळात आपण गावागावांत जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे म्हणून श्री लंके म्हणाले, या प्रारंभ झालेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप हा नगरच्या विशाल गणपतीचे दर्शन घेऊन युवानेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार आहोत.
यावेळी, शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत, पाथर्डी-शेवगाव नेते ॲड प्रतापकाका ढाकणे यांच्यासह अन्य नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.


या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातून आमदार निलेश लंके यांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापकाका ढाकणे यांनी सकाळी दहा वाजता पाथर्डी ते मोहटादेवी गडापर्यंत मोटरसायकल रॅलीचे नियोजन केले होते.साडेनऊ वाजता मोहटा देवीचे दर्शन घेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत देवीला नारळ वाढवत यात्रेचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ मोहटादेवीच्या पायथ्याशी जाहीर सभा घेत तुतारी वाजवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!