सातारा जिल्ह्यातून खूनाचा प्रयत्न करणारा फरारी आरोपी अटक ; नगर एमआयडीसी पोलसांची कारवाई

सातारा जिल्ह्यातून खूनाचा प्रयत्न करणारा फरारी आरोपी अटक ; नगर एमआयडीसी पोलसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
Nagar : खूनाचा प्रयत्न करणारा फरारी आरोपीस एमआयडीसी पोलसांनी सातारा जिल्ह्यात जाऊन पकडण्याची कारवाई एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. निखिल शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. दत्तनगर वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकों राजेंद्र सुद्रिक ,पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोना विष्णू भागवत, पोकाॅ किशोर जाधव, पोशि नवनाथ दहिफळे, मोबाईल सेल अहमदनगरचे पोकॉ राहुल गुंडु आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १५ एप्रिल २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माझे वडील अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्तीजवळ शिंदे यांच्या शेतात त्यांचा ओळखीचा निखिल शिवाजी गांगर्डे (रा. दत्तनगर वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर) याने पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे त्याच्याकडील चाकूने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन त्यांना गंभीररीत्या जखमी केले आहे, या
तुषार अशोक शेळके (रा. वडगाव गुप्ता ता.जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं ३७५/२०२४ भादवि कलम ३०७,३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना गुन्ह्यातील फरार आरोपी निखिल शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. दत्तनगर वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर) हा सातारा येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपास पथक तयार करुन आरोर्पीना पकडण्याकरीता रवाना केले. आरोपीस साकुर्डी (ता. कराड जि. सातारा) येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव निखिल शिवाजी गांगर्डे (रा.दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि. अहमदनगर) असे सांगितले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात आरोपीला अटक केला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!