संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल २७ लाख ४४ हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. बाबु लखुभाई राठोड, (रा. राजकोट, राज्य गुजरात), सिध्देश संदीप खरमाळे (रा. भांडगांव, ता. पारनेर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष लोढे, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.

एलसीबी टिम’ अहमदनगर शहर परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना दि.१९ जुलैला एलसीबी पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली.ती माहिती एलसीबी टिम’ला सांगितली. तात्काळ एलसीबी टिम’ही पंचासह नगर कल्याण रोडने जाऊन नेप्ती नाक्याजवळ ४.३० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. या दरम्यान थोडाच वेळात एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवून थांबण्याचा इशारा करता चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यावेळी गाडीचे केबिनमध्ये दोनजण बसलेले दिसले. त्यांना पोलीसांची ओळख सांगून, आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विदेशी दारुचे बॉक्स असल्याची खात्री होताच. दोघांना विदेशी दारु वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपुस करता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे बाबु लखुभाई राठोड ( रा. राजकोट, राज्य गुजरात), सिध्देश संदीप खरमाळे (रा. भांडगांव, ता. पारनेर) असे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातून ३ लाख ४५ हजार ६०० रुपये किंमतीचे मॅकडॉल्स व्हीस्की १८० मिलीचे ४८ बाॅक्स, १ लाख ९० हजार ८० रुपये किंमतीचे रॉयल स्टँग १८० मिलीचे २२ बाक्स, रॉयल चॅलेज ७५० मिलीचे २२ बाक्स, १ लाख ७२ हजार ८०० रुपये किंमतीचे रॉयल चॅलेज १८० मिलीचे २० बाक्स व १५ लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा विटकरी रंगाचा टेम्पो असा एकूण २७ लाख ४४ हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला, त्या दोघांना ताब्यात घेऐ त्यांच्याविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०५०/२३ मपोकाक ६५ (अ) (ई), ८०, ८३, ९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.