संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बॉलिवूड सेलिब्रेटींनी नव्या वर्षाचे जोरदार सेलिब्रेशन केले. अनेक सेलिब्रेटी आपल्या फॅमिलीसोबत सीक्रेट वेकेशनवर गेले होते. बॉलिवूडचे आवडते कपल विराट आणि अनुष्काने देखील धमाकेदार सेलिब्रेशन केले. दोघांच्या न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. अनुष्काने विराट सोबतचा फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. थ्री लेअर केक कटिंग करुन दोघांनी लेक वामिकासोबत नव्या वर्षाचे स्वागत केले. अनुष्काने सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत छान कॅप्शन देत २०२० चे आभार मानले. अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘२०२० या वर्षाने फार आनंद दिला. २०२१ चे मनापासून आभार’. अनुष्का आणि विराटचा मेड फॉर इच अदर फोटो पाहून फॅन्स देखील खूश झाले आहेत.
विराट सध्या साऊथ आफ्रिकेत क्रिकेट टेस्ट सीरीजसाठी गेला आहे. अनुष्का आणि वामिका देखील विराट सोबत आहे. तिघांनी साऊथ आफ्रिकेत न्यू इअर सेलिब्रेशन केले. विराट अनुष्काच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेरात टिपण्यात आले आहेत. विरुष्काच्या न्यू इअर सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यात विरुष्का केक कटिंग करताना दिसत आहेत. एका आलिशान हॉटेलमध्ये विरुष्काने न्यू इअर सेलिब्रेशन केल्याचे सांगितले आहे. सेलिब्रेशनला विरुष्काने वामिका सोबत डान्स देखील केला.
अनुष्का लवकरच नव्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. अनुष्काने २०२२ साठी तीन सिनेमे साइन केले असून लवकरच ती सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. यातील २ सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज होणार आहेत. तर एक सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.