संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Jalgaon – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवणार असल्याचा इशारा सरपंच परिषदेनं राज्य सरकारला दिला आहे. महाविकास आघाडी सरकारपुढे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होत नाही आहेत. हिवाळी अधिवेशन, आरक्षणासंदर्भात आणि निवडणुकीचे प्रश्न असताना आता सरपंच परिषद आक्रमक झाली आहे. वित्त आयोगाच्या रक्कमेत कपात करु नये, अेनेकवेळा शासनाची भेट होऊन मागण्या मान्य होत नसल्यामुळे राज्यातील सरपंच परिषदेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळेच ग्रामपंचायती बंद ठेणार असल्याचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्हा शाखेतर्फे जिल्ह्यातील सरपंचांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. काकडे यांनी सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या मागण्यांकडे गुलाबराव पाटील यांचे लक्ष वेधले. तसेच वित्त आयोगाच्या निधीमध्ये कपात करण्यात येत आहे. ही कपान करण्यात येऊ नये आणि अन्य १० ते १२ मागण्या आहेत. या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार ते केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करत आहोत. परंतु जर हिवाळी अधिवेशनापर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यातील सर्व ग्रामपंचायती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बंद राहतील. असा इशारा प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे. जळगावमध्ये सरपंच मेळावा सुरु असताना व्यासपीठावर सूत्रसंचालन करणाऱ्या एकानं भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतलं. यावर काही सरपंचांनी आक्षेप घेत हा राजकीय मेळावा कसा? असा सवाल केला. सरपंच लोकनियुक्त असून तो कोणत्याही पक्षाचा नसतो असे सांगण्यात आले. त्यामुळे चांगलाच गदारोळ माजला होता. यानंतर आयोजकांनी माफी मागितल्यामुळे मेळाव्यातील वाद मिटला.