विष्णूपंत म्हस्के व शामराव व्यवहारे यांचा सत्कार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Ahemnagar – रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधून सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. आज शिक्षणाचे व्यापारीकरण होत असतांनाही संस्थेने आपला लौकिक जपला आहे. नगरमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातही शहरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना आधुनिक शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी पदाधिकारी, शिक्षक प्रयत्न करत आहेत. या विद्यालयाच्या सल्लागार समितीवर विष्णूपंत म्हस्के व शामराव व्यवहारे यांची झालेली निवड आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. या पदाच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन त्यांचा विकास घडवतील असा विश्वास आहे. त्यांच्या कार्यास आमच्या सदैव शुभेच्छा राहतील, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सल्लागार समितीवर विष्णुपंत म्हस्के व श्यामराव व्यवहारे यांची विद्यालयाच्या निवड झाल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौदर, दत्ता बनकर,सुनील निकम, बजरंग भुतारे, ऋषी चाफे, हर्षल मस्के, विशाल वालकर, महेश शिंदे, आनंद मुथ्था, दत्ता भागानगरे, तारीक कुरेशी, प्रफुल शेटे, गणेश चव्हाण, सौरभ राऊत, महेश अडागळे आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना विष्णूपंत म्हस्के म्हणाले, रयत शिक्षण संस्थेने नेहमीच वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीचा विचार करता संस्थेने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापुढील काळातीही सर्वसामान्यांन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील. आज केलेल्या सत्कारामुळे आमच्या कार्यास पाठबळ मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू फुलसौंदर यांनी केले. बजरंग भुतारे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थितांनी विष्णूपंत म्हस्के व श्यामराव व्यवहारे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.