संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – सरपंच यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा सरपंच संघटीत चळवळीचे प्रणेते बाबासाहेब पावसे संगमनेर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. पत्रकारिता क्षेत्रातील शिवराज पाटील पवार यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना यावर्षीचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी बाबासाहेब पावसे, आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरू डॉ.रामकृष्णदास लहवितकर महाराज नाशिक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी दिपक पाटील, राधाताई सानप महाराज, डॉ.राधेश्याम गुंजाळ, राजाराम भापकर गुरूजी, विजयकुमार तनपुरे महाराज, लाभेल ओटी, यादवराव पावसे, सुरेशराव कोते, विजयाताई काचावार, एकनाथराव ढाकणे, धनंजय डि.विसपुते, प्रमिला एखंडे, करूणा धनंजय मुंडे, रोहित संजय पवार, काशिनाथ पावसे आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या पत्रकारीतेतील कार्याची दखल घेऊन त्यांच्या व सामाजिक क्षेत्रातील चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल यावेळी त्याच्या सत्कार करण्यात आला.