सरपंच – ग्रामसेवकाच्या संगनमताने भ्रष्टाचार

👉 जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर
– नगर तालुक्यातील खांडके ग्रामपंचायतमध्ये गेल्या ३-४ वर्षात सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून ग्रामस्थांची आणि शासनाची फसवणूक केली आहे. या भ्रष्ट कारभाराची तातडीने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, खांडके ग्रामपंचायतमध्ये सरपंच ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून केलेला भ्रष्टाचारामध्ये सन २०१७-१८ वर्षामध्ये ८३ हजार रुपयांचे फर्निचर चेक काढून देखील अद्यापपर्यंत वर्ल्ड या कंपनीचा कर रुपाने आलेला चेक ६,७२,००० परस्पर खाते उघडून त्या पैशांचा अपहार केलेला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केलेल्या स्टेटमेंट न देता ग्रामसेवकांनी सतत उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहे. तसेच सन २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या खात्यांमधून अंगणवाडी आणलेले नाही. तसेच लालपुर विन्ड एलएडीसाठी, समाज मंदिरासाठी एलएडी ग्रामपंचायत खात्यातून रक्कम काढून अद्यापपर्यंत वस्तू आणलेल्या नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच २०२० ते २०२२ या कालावधीत जमा केलेली घरपट्टी व पाणीपट्टी रक्कम रुपये १ लाख एवढी जमा झालेली असून ग्रामनिधीमध्ये न भरता परस्पर पैसे खर्च केलेले आहेत. फेब्रुवारी २०२१ ते जून २०२२ पर्यंत ग्रामपंचायतीने कोणतेही विकासात्मक काम केलेली नाहीत. १४ वा वित्त आयोग व १५वा वित्त आयोग या पैशांचा खर्च कामासाठी न करता, परस्पर कामामध्ये बदल करुन निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर २०२०-२१ मध्ये १५वा वित्त आयोगातील मंजूर कामे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच चौकशी होईपर्यंत त्याकामास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थ किरण चेमटे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चेमटे, भगवान ठोंबे, बंडू चेमटे, सोमनाथ चेमटे, समीर देशमुख, संतोष मचे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!