संतांच्या कार्याचा वारसा असाच पुढे चालू राहिला पाहिजे : संभाजी कदम

माळीवाडा येथे  हरिनाम सप्ताहांतर्गत स्त्री रोग तपासणी शिबीर संपन्न

 संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
संत सावता महाराज यांनी जगाच्या कल्याणासाठी  आपले आयुष्य वेचले. त्यांनी सामान्यांसाठी केलेले कार्य अनमोल व महान आहे. त्यांच्या कार्याचा वारसा असेच पुढे चालू राहिला पाहिजे. संतांनी आपणास सर्वकाही दिले आहे. आपली हिंदू संस्कृती महान आहे, या संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. यासाठी अशा धार्मिक उपक्रमांची गरज आहे. याचबरोबर आरोग्यदायी उपक्रमातून समाजाचे हित जोपासणेही महत्वाचे आहे. कृतीतून संतांचे विचार समाजपर्यंत पोहचविण्याचा काम उत्सव समितीच्यावतीने होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

     श्री संत सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने माळीवाडा येथे अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने आयोजित स्त्री रोग तपासणी शिबीराचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, अमोल येवले, नगरसेविका सुवर्णा जाधव, डॉ.प्राजक्ता जाधव, समता परिषदेचे दत्ता जाधव, उत्सव समितीचे छबूनाना जाधव, अनिल चेडे, चंद्रकांत ताठे, सतीश डागवाले, कैलास खरपुडे, रमेश चिपाडे, भाऊसाहेब पुंड, संतोष मेहेत्रे, बजरंग भुतारे, लक्ष्मण पडोळे, बाळासाहेब पुंड आदि उपस्थित होते.

     बाळासाहेब बोराटे म्हणाले, थोर संतांच्या विचारांचे किर्तन – प्रवचनातून समाजाचे प्रबोधन होते. त्यासाठी उत्सव समितीच्यावतीने  या सप्ताहात राज्यातील विविध नामवंत किर्तनकार व प्रवचनकारांची सेवा याठिकाणी मिळत असल्याने भाविकांसाठी ही एक पर्वणीच असते. त्यामुळेच आज जिल्ह्यात सर्वदूर या सप्ताहाची प्रचिती झालेली असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी डॉ.प्राजक्ता जाधव म्हणाल्या, आज अनेक महिला या कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आहार, व्यायामाच्या अभावाने त्यांच्यात हिमोग्लबिनचे प्रमाण कमी असते. याबाबींकडे महिलांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच गर्भवती महिलांनी याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या आरोग्यबरोबरच आपल्या बाळाचेही आरोग्य आपल्यावर अवलंबून असल्याने काळजी ही महत्वाची असते. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी होणेही गरजेचे आहे.

     कार्यक्रमाच्या प्रास्तविकात उत्सव समितीचे छबूनाना जाधव यांनी सप्ताहांतर्गत होणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अनिल चेडे यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले. यावेळी आनंद सत्रे, आदेश जाधव, किरण लोंढे, गणेश अरगडे, डॉ.मयुरी धोरण, विशाल गायकवाड आदि उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!