संतप्त सकल वंजारी समाजाचा पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या ; महिलाबद्दल अपशब्द बोलणा-यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वंजारी समाजातील महिलाबद्दल गलिच्छ भाषेत अशब्द बोलणा-या सचिन लुगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर सकल वंजारी समाजाचा ठिय्या आंदोलन करीत पाथर्डी पोलिसांना निवेदन दिले.
यावेळी पोलिसांना राष्ट्रीय वंजारी परिषद, जय भगवान महासंघाच्या वतीने निवेदन दिले आहे.
यावेळी शिवसेनेचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णपंत ढाकणे, भगवान दराडे, अर्जून धायतडक, राष्ट्रीय वंजारी परिषदेचे अध्यक्ष राजूभाऊ दगडखैर, रंजित बेळगे, सुनिल पाखरे, दत्ताभाऊ खेडकर, महादेव दहिफळे, अविनाश पालवे, भाऊ शिरसाठ, पोपट पालवे, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गर्जे, प्रतिक खेडकर, ॲड. विठ्ठलराव बडे आदिंसह वंजारी समाजातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.