संघर्षयोद्धा माजी केंद्रीयमंत्री स्व: बबनराव ढाकणे अनंतात विलीन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे शनिवारी (दि.२८) दुपारी सरकारी इतमामात मानवंदना देऊन मोठ्या दुख:मय वातावरणात संघर्षयोद्धा, शेतकरी, उसतोड कामगारांचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांच्यावर शोककुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी मुलगा तथा पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे नेते ॲड प्रतापकाका ढाकणे, सून प्रभावती ढाकणे, मुलगी, नातू यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, कृषिमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुजय विखे पा., माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.मोनिकाताई राजळे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, आमदार भिमराव धोंडे, राधाताई महाराज सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जि.प.सदस्या शारदाताई काकडे, उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे, पांडुरंग खेडकर, विठ्ठलराव लंघे,माजी आमदार नरेंद्र घुले, घनश्याम शेलार, सुशिलाताई मोराळे, साहेबराव दरेकर, जिल्हाधिकारी सालीमठ, भानुदास मुरकुटे, जि.प.सदस्य राजळे, जि.प.माजी सदस्य अर्जून शिरसाठ, अरुण मुंडे, बाबा सानप, गहिनीनाथ शिरसाठ, युवानेते धनंजय बडे पा.,गोकुळ दौंड, भिमराव फुंदे, सरपंच संजय बडे पा, शिवशंकर राजळे,माजी महापौर अभिषेक कळमकर,पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील सरपंच, तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर भाषणे झाली.