संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव – संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याने एफआरपी प्रमाणे ८३ कोटी ५३ लाख रुपये पेमेंट शेतकऱ्यांना अदा केले आहे. चालू गळीत हंगामात विक्रमी उसाची लागवड झाल्याने क्षमता वाढवून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केले.
बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या २०२१-२२ गळीत हंगाम हाती घेण्यासाठी रोलर पूजन व मशिनरी दुरुस्ती कामाचा शुभारंभ बुधवारी (दि.11) तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, सिद्धेश ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री ढाकणे म्हणाले गत हंगामात ४ लाख ६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केलेल्या उसाचे शासनाच्या एफआरपी प्रति २०५७ टनाप्रमाणे ८३ कोटी ५२ हजार हजार रुपयेचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात दि.१५ जुलै पूर्वीच खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. तसेच ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांचे पेमेंट अदा केले असून, चालू हंगामात अतिरिक्त ऊसाचे मोठे आव्हान आहे. सर्वांना मोठ्या जिद्दीने संघटितपणे सामोरे जावे लागणार आहे.
यंदाच्या हंगामात विक्रमी उसाची लागवड झाल्याने नोंदणी केलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्याची २५०० मेट्रिक टन क्षमता आहे. ती वाढवून सुमारे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने हाती घेतले. चालू हंगाम लवकरच यशस्वीपणे हाती घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे असल्याचे श्री ढाकणे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, सिद्वेश ढाकणे, संचालक सुरेशचंद्र होळकर, रणजित घुगे, शेषेराव बटुळे, सुभाष खंडागळे, संदीप बोडखे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे,प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मुख्य अभियंता प्रवीण काळोशे, अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, पोपटराव केदार, शेतकी विभागाचे अभिमन्यू विखे, कारभारी जावळे, तुकाराम वारे,
यांच्यासह कामगार,सभासद शेतकरी आदी उपस्थित होते.
संकलन : बाळासाहेब खेडकर