श्री विशाल देवस्थानचे विश्वस्त अनुभवी धार्मिक कार्यात स्वत:ला वाहून घेणारे – भगवान फुलसौंदर

मोरया ना.सहकारी पतसंस्थेच्यावतीने सत्कार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर
श्री विशाल गणेश हे  शहराचे ग्रामदैवत आहे, नवसाला पावणारा श्री विशाल देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देवस्थानचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. भाविकांना सेवा देऊन मंदिराच्या लौकिकात भर घालत आहे.  विश्वस्तपदी निवड झालेले सर्वच विश्वस्त अनुभवी धार्मिक कार्यात स्वत:ला वाहून घेणारे आहेत. हे विश्वस्त देवस्थानचे कार्य आणखी जोमाने करतील. तसेच अंबादास गारुडकर यांना समता परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची पावती म्हणून प्रदेश उपाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. या सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काम करणार्‍यां व्यक्तीमत्वांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

मोरया ना.सहकारी पतसंस्थेच्यावतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी रंगनाथ फुलसौंदर, संजय चाफे, प्रा.माणिकराव विधाते, नितीन पुंड तसेच समता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अंबादास गारुडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, संचालक विष्णू फुलसौंदर, विष्णूपंत म्हस्के, अ‍ॅड.भाऊसाहेब कावळे, राजेंद्र फुलसौंदर, मच्छिंद्र फुलसौंदर, गोरक्षनाथ हजारे, विजय पुंड, सुनिल राऊत, ज्ञानेश्वर फुलसौंदर, मंदार मुळे, सतीश नन्नवरे, महेश शिंदे, बाळासाहेब पटवेकर, वैभव गाडिलकर, प्रदीप शिंदे, किरण बोरुडे, डॉ.सुदर्शन गोरे, राजेंद्र पडोळे, सुदामराव बनसोडे आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना रंगनाथ फुलसौंदर म्हणाले, श्री विशाल गणेश देवस्थानची प्रचिती सर्वदूर पोहचत आहे. भाविकांच्या सहकार्यातून मंदिराचा झालेला जिर्णोद्धार नेत्रदिपक असाच आहे. विश्वस्त मंडळ मंदिराच्या कार्यात चांगल्या प्रकारे योगदान देत आहे. हे सर्वांचे श्रद्धास़्थान असल्याने या लौकिकात भर टाकण्याचे काम आपणा सर्वांना एकत्रित करावयाचे असल्याचे सांगितले. प्रास्तविकात विष्णू फुलसौंदर यांनी सत्कारमुर्तीच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अ‍ॅड.भाऊसाहेब कावळे यांनी केले तर सर्वांचे आभार सुनिल राऊत यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!