श्री वामनभाऊ विद्यालयामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी -:
तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. वय वर्ष (६)सहा ते (१४) चौदा वयोगटातील सर्व मुलांची शाळेत १०० % रोज पटनोंदणी व्हावी. तसेच एकही बालक शिक्षण हक्कापासून वंचित राहू नये याकरिता शिक्षणविभागाकडून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या प्रथम दिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. याच अनुषंगाने तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयात आज सकाळी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जगन्नाथ बडे हे होते. प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत आज उत्साही वातावरणामध्ये विद्यालयात शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली.

श्री बडे म्हणाले की, कोणत्याही कामामध्ये यशस्वी व्हावयाचे असेल तर त्याची सुरुवात नेहमी चांगली करावी लागते. त्याप्रमाणे शाळेमधील आजचा प्रवेशाचा कार्यक्रम पाहता आपली शाळा व विदयार्थी नक्कीच गगनभरारी घेतील, आणि गावची व पालकांची मान उंचावतील अशी आशा वाटते. आज शाळेच्या प्रथम दिनानिमित्त विद्यालयात इयत्ता पाचवी ला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर व मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संच, पेन,वही व गुलाबपुस्प देवून स्वागत केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य डॉ राजेंद्र खेडकर,दादासाहेब बारगजे, अर्जुन केदार,संजय बारगजे,पत्रकार सोमराज बडे,दगडू होडशिळ,भालेराव सर,बाबासाहेब राजगुरू,गर्जे मॅडम,चिपाडे मॅडम,अकोलकर सर ,श्री म्हस्के, श्री तुपे ,श्री चौधर सर,डॉ.रवींद्र तोटे यांचेसह इतर शिक्षक आणि पालक व विद्यार्थी उपस्तीत होते. याप्रसंगी उपस्तितं मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन व शिक्षकांना प्रेरणा दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करणेत आले. तसेच गावकऱ्यांच्या वतीने विद्यालयाचे नवनियुक्त मुख्यधापक श्री नरोडेे सर व बबनराब ढाकणे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे लेखक डॉ.उदमले सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री घुलेसर यांनी केलीे. सूत्रसंचालन श्री दहिफळेसर यांनी तर आभार प्रदर्शन श्री कुदळे सर यांनी केले.
👉संकलन-पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!