संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगांव : येथील आडत व्यापारी व त्यांची भाऊजयीचा चोरीच्या उद्देशाने खून करणारा सराईत आरोपी पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे.
खेडकर टाबर चव्हाण (वय ३२, रा. म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण, जि. संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील तसेच परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर व शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि विलास पुजारी यांच्या सूचनेनुसार सपोनि पावरा सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, विजय वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदीप दरदंले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोकाॅ रविंद्र घुगांसे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, संदीप पवार,चापोहेकॉ संभाजी कोतकर,उमाकांत गावडे, चापोना भरत बुधवंत, चापोकाॅ अरुण मोरे तसेच शेवगांव पोलीस ठाण्याचे पोकाॅ बाप्पा धाकतोडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे आयजी बी. जी. शेखर पाटील यांनी घटनेची माहिती घेऊन एसपी राकेश ओला यांना एलसीबी टिम तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. आदेशान्वये एलसीबी दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी तीन वेगवेगळी पथके तयार केली. एका पथकाने शेवगांव, शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा माग घेणे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत होते. दोन पथके लगतचे बीड व पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील संशयीत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याकामी प्रयत्न करत होते. सुचनेप्रमाणे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन पथके रवानापथके शेवगांव परिसरात फिरुन घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे आरोपीचे वर्णन, आरोपीचे चालण्याची पध्दत (बॉडीलँग्वेज) व त्याने घातलेले कपडे व गुन्हा करण्याची पद्धत या आधारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रीत केले होते. दरम्यान एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी हा खेडकर चव्हाण (रा. बिडकीन, ता. पैठण, जि. संभाजीनगर) हा असून तो त्यांचे गांवी आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी तात्काळ प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेऊन तसेच स्थानिक पोलीसांची मदत घेऊन संशयीत आरोपीचे गावी म्हारोळा, बिडकीन (ता. पैठण) येथे पाठवून आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. पथकाने बिडकीन (ता. पैठण) येथे जाऊन छत्रपती संभाजीनगर (ग्रा) एलसीबी पोहेकॉ वाल्मिक निकम यांना मदतीस घेऊन संशयीत आरोपीची माहिती घेतली. संशयीत आरोपी हा म्हारोळा, बिडकीन (ता. पैठण) येथे गांवात फिरताना मिळून आला, त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव खेडकर टाबर चव्हाण (वय ३२, रा. म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे असल्याचे सांगितले. त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने टाटा एस. गाडीमध्ये येऊन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास शेवगांव पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस करीता आहे.
आरोपी खेडकर टाबर चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुध्द संभाजीनगर जिल्ह्यात मोक्का, खुनासह दरोडा, खुनासह जबरी चोरी, चोरीच्या उद्देशाने खुन करणे चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.