शेवगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतमध्ये सदस्यपदासाठी ५७५ तर सरपंचपदासाठी ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात ; दुरंगी तिरंगी लढत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव – शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी एकूण १०३७ अर्ज दाखल झाले होते. २७ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी एकुण १७३ अर्ज दाखल झाले होते. झालेल्या छाननीमध्ये सदस्य पदासाठी १५ तर सरपंचपदासाठी ३ अर्ज नामंजूर झाले होते माञ बुधवारी माघारीच्या दिवशी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केलेल्या पैकी ४३६ उमेदवारांनी तर सरपंचपदासाठी ९२ उमेदवाराने बुधवारी अर्ज माघार घेतल्याने सदस्यपदासाठी एकुण ५७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी दाखल अर्जापैकी ९२ उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
पोटनिवडणुकीसाठी दहिगाव-शे येथे १ जागेसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने जागा रिक्त राहीली तर कुरुडगाव-रावतळे येथे एका सदस्य पदासाठी एकूण ३ अर्ज दाखल झाले होते एकाने माघारी घेतल्याने २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय प्रतिष्ठेच्या बोधेगाव, गोळेगावं, लाडजळगाव, शहरटाकळी, थाटे, येथे तिरंगी तर बालमटाकळी, आव्हाने, वडुळे खुर्द, वडुले बु, एरंडगाव समसुद, एरंडगाव भागवत, वरुर, ढोरसडे अंत्रे, भगुर, येथे दुरंगी सामना होत आहे.
संकलन: बाळासाहेब खेडकर, बोधेगाव