शेवगाव तालुक्यात दरोडा घालणारे ५ आरोपी पकडले ; अ.नगर एलसीबीची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video)
शेवगाव – तालुक्यातील चापडगांव व आखेगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे ५ आरोपी पकडले. या कारवाईत २ लाख ४९ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
दिपक गौतम पवार (वय ३५, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर), नितीन मिसऱ्या चव्हाण (वय २०, रा. जोडमालेगांव, ता. गेवराई, जि. बीड), गोविंद गौतम पवार (वय २०, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर), किशोर दस्तगीर पवार (वय १९, रा. हिरडपुरी, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर), राजेश दिलीप भोसले (वय ३०, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, पोना रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चासफौ. उमाकांत गावडे, चापोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.
घडलेल्या घटनेबाबत कमलेश सुभाष वाल्हेकर ( रा. चापडगांव शिवार, चापडगांव, ता. शेवगांव जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ११७२/२०२३ भादवि कलम ३९२,४५२,५०४,५०६,३४ व गु.र.नं. ११८३/२०२३ भादवि कलम ३९४, ४५२, ४५७, ३८०, ५०६, ५११, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
या आदेशान्वये एलसीबीचे पोनि श्री. आहेर यांनी विशेष एलसीबी टिम’ची नेमणूक करुन तात्काळ रवाना केली.
विशेष एलसीबी टिम’ने घटना ठिकाणी जाऊन बारकाईने पाहाणी करुन शेवगांव तालुक्यामध्ये आरोपींची माहिती काढत असतांना पोनि श्री आहेर यांना गुन्हा हा दिपक गौतम पवार (रा. टाकळीअंबड, ता. पैठण) याने व त्याचे इतर साथीदारांनी केला आहे. ते सध्या त्यांचे टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. ही माहिती एलसीबी टिम’ला सांगून खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
एलसीबी टिम’ने तात्काळ टाकळीअंबड (ता. पैठण) येथे जाऊन दिपक गौतम पवार यांच्या घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला. या पालांमधून काहीजण जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळून गेले. पोलीसांनी त्या ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जाऊन लपून बसलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांचे नावे दिपक गौतम पवार , नितीन मिसऱ्या चव्हाण, गोविंद गौतम पवार, किशोर दस्तगीर पवार, राजेश दिलीप भोसले असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांची इतर फरार साथीदार सोन्या मजल्या भोसले (रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर), उद्या मजल्या भोसले (रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर), संभाजी गौतम पवार, अभिषेक भैया चव्हाण (रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर), संभाजी गौतम पवार याचा मित्र नांव गांव माहित नाही याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
मिळून आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस करीत आहे.