शेवगाव-गेवराई राज्य मार्गवर राक्षी येथे एसटीबस व टेम्पोचा अपघात ; एक ठार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव-
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुकानजिक असणारे राक्षीजवळ एसटी बस व टेम्पो जोराची धडक झाली. या अपघातात एक ठार, दोन जण जबर जखमी असून बसच्या चालकाच्या प्रसावधने मधील प्रवासी बलंबल वाचले!


याबाबत समजलेले माहिती अशी की, शेवगाव-गेवराई राज्य मार्गवरवर राक्षी येथे एसटीबस व ४०७ टेम्पो यांच्यात शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटी बसच्या चालकाच्या प्रसंगावधान मुळे बसमधील प्रवाशी बालंबाल वाचले गेले व मोठा अनर्थ टळला. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले
शेवगाव- गेवराई राज्यमार्गावर महामंडळाची एसटी बस (एमएच ४० या ५५७१) ही नव्याने सुरू झालेली अहमदनगर- पुसद ही एसटी बस आज शनिवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास शेवगावहुन -गेवराईच्या दिशेने जात असताना राक्षी ता शेवगाव नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर चापडगावहुन शेवगावच्या दिशेने जाणारा फळमाल वाहतूक करणारा 407 टेम्पो ( एम एच ०८ डब्लू १४७१) यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन टेम्पो चालक जागीच ठार झाला तर एसटीबस चालक भोपालसिंग जाणूसिंग पवार (रा पुसद जि यवतमाळ) व बसमधील प्रवासी आकाश भगवान रोठे (रा बीबी ता.लोणार जि.बुलढाणा ह.मु. नेवासा) पंचायत समितीचे कर्मचारी हे अपघातात जबर जखमी झाले तर वाहक संतोष सीताराम आढाव इतर प्रवाश्यांना जबर मार लागला आहे. जखमींवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपाचार सुरू आहेत अपघात होताच, राक्षी ग्रामस्थ व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. एसटी बस चालकाने एसटी बस राज्य मार्गलगत रस्त्यावरून शेतात घातल्याने मोठी दुर्घटना टळली गेली लगत विजेचा खांब होता. त्यावर बस गेली असती तर मोठी घटना घडली असतीसदर घटनेची माहिती तातडीने शेवगाव पोलिसांना दिली मात्र सुमारे दीड तासाने घटनास्थळी दोन पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. तो पर्यंत टेम्पो चालकाचा देह जागीच टेम्पोत मदतीअभावी टेम्पोत जागीच अडकलेला होता. मात्र मयत टेम्पो चालकाची ओळख पटली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!