संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव – अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे जिल्हा अध्यक्ष पै.वैभव लांडगे व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे यांच्या संयुक्त विद्यमानाने पारनेर येथील शिवछत्रपती कुस्ती संकुल येथे रविवार दि.२९ रोजी घेण्यात आलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा निवड चाचणी मधे (ग्रीको रोमन) कुस्ती प्रकारात ८७ किलो वजनी गटामध्ये पै. ऋषीकेश जोशी यांनी अवघ्या २० सेकंदात पै.कृष्णा सानप यांना फ्रंट सालतो या कुस्तीच्या डावामधे चितपट करून आपला विजय मिळविला. पै. ऋषीकेश जोशी यांची अहमदनगर जिल्ह्यातून निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पै. ऋषीकेश जोशी हे सध्या गोकुळ वस्ताद तालीम गंज पेठ, पुणे येथे महाराष्ट्र केसरी पै.दत्ताभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव करत आहे.
संकलन : बाळासाहेब खेडकर