शेतकरी, विद्यार्थी यासह सार्वजनिक हिताच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले बाळासाहेब कोळसे पा. यांना सामाजिक संघटनांकडून पाठिंबा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: शेतकरी व विद्यार्थी प्रश्नासंबंधी गेल्या पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळसे यांना आज विविध विद्यार्थी व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, खाजगीकरणाला विरोध तसेच विद्यार्थी नोकरी अर्जासाठी लागणारी फी कमी करावी या विषयांसाठी कोळसे हे उपोषण करत आहेत, त्यांची ७ व्या दिवशी तब्येत खालावली आहे, आवाज खाली गेला असून डोळ्यासमोर अंधारही येत आहे, तरी त्यांची आज पर्यंत कुठलिही शासन स्तरावर वैद्यकीय तपासणी झालेली नाही, त्यामुळे वरील विविध संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही त्यासंबंधी निवेदन दिलेले आहे. उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल खाडे, युवक क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, मानवाधिकार संघटनेचे उमेश आमटे, शिक्षक संघटनेचे पानसरे सर यांच्यासह अनेक विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.