‘शिर्डी नगरपंचायत’ निवडणुकीची घोषणा


👉 दि. 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबर रोजी मतमोजणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – 
शिर्डी नगरपंचायत ची निवडणूक घोषित झाली असून 21 डिसेंबरला मतदान होणार आहे व 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे . निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख घोषित केली असून शिर्डी शहरांमध्ये आचारसंहिता सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार असून हा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्यातील निवडणुका होणाऱ्या नगरपंचायतींच्या क्षेत्रात लगेचच आजपासून आचारसंहिता लागु झाली आहे.
राज्यामधील  105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.
 
दरम्यान शिर्डी नगरपंचायतीची निवडणूकही 21 डिसेंबर रोजी होणार असून आज पासून शिर्डी शहरातही अचारसहिता सुरू झाली आहे .शिर्डीतील विविध पक्ष संघटना नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावे.असे आवाहनही शिर्डी नगरपंचायत चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायत ची निवडणूक जानेवारी फेब्रुवारी महिन्यात होईल असा अंदाज सर्व नागरिक व इच्छुक उमेदवारांकडून होत होता मात्र अचानक आज २१ डिसेंबरला ही निवडणूक घोषित झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठी धावपळ होणार आहे व आतापासूनच अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल असे  मदान यांनी सांगितले.राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे मदान म्हणाले. व त्याची अंमलबजावणी अहमदनगर जिल्ह्यातही सुरू झाली असून आज पासून शिर्डी शहराचत आचारसंहिता सुरू झाले आहे.राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुका आज घोषित झाल्यानंतर त्यामध्ये शिर्डी नगरपंचायत तिचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र असणाऱ्या शिर्डी नगरपंचायत ची निवडणूक 21 डिसेंबरला होऊन मतमोजणी 22 डिसेंबरला होणार आहे, अशी घोषणा झाल्यानंतर  आजपासून अचारसहिता सुरू झाली आहे. शिर्डी शहरातील विविध पक्षांचे फलक झाकण्यात येत आहेत. तसेच नगरपंचायतीच्या वतीने विविध पक्षांचे झेंडे काढण्यात येत आहेत. आपल्या शिर्डी शहरात आचारसंहिता सुरू झाल्यामुळे विविध पक्ष ,संघटना, नागरिक यांनी आचारसहिता पालन काटेकोरपणे करावे असे आवाहनही शिर्डी नगरपंचायत चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. शिर्डी नगर पंचायतीची निवडणूक झाल्यानंतर इच्छुक उमेदवार कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या तयारीला लागले असून धावपळ वाढली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!