शिर्डी क्रांती युवक मंडळाचा साईबाबा संस्थांनतर्फे सन्मान


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी-
येथील क्रांती युवक मंडळाने साईभक्तांना चांगली सेवा दिल्याने प्रथमच मंडळाचे अध्यक्ष सचिन तांबे पा समवेत मंडळ सदस्यांचा श्री साईबाबा संस्थांनातर्फे संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत मॅडम यांच्या हस्ते श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.


शिर्डी क्रांती युवक मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून साईभक्तांना गर्दीत सुलभ दर्शन घडविण्यासाठी सेवा दिली. तसेच साईभक्तांच्या सेवेसाठी तत्पर राहून, एकप्रकारे साईसंस्थानासह शिर्डी या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्रास प्रत्येक साईभक्तांच्या मनमनात मानाचे स्थान निर्माण केले.तसेच  ‘श्रद्धा व सुबरी’ ही साईबाबांची विचारधारा रुजविण्याचे मोठे काम क्रांती युवक मंडळाने केले आहे. याचीच दखल घेऊन  साई संस्थानच्या वतीने मंडळाचा प्रथमच असा सन्मान करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत मॅडम यांच्या हस्ते झाला आहे. यावेळी विश्वस्त सचिन गुजर यांच्यासह  विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!