शिर्डीत सव्वा लाख रुपयांचा गुटखा जप्त ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई

शिर्डीत सव्वा लाख रुपयांचा गुटखा जप्त ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : शिर्डी येथे गुटखा विक्री करणाऱ्यास पकडून १ लाख २४ हजार ३५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई नगर एलसीबी टिम’ने केली आहे. फहाद ताहिरहसन अन्सारी (वय २६, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, मुळ रा. कोटकादर, ता. नगिणा, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोउपनि समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार अतुल लोटके, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, फहाद ताहिरहसन अन्सारी (रा. शिर्डी, ता. राहाता), शोएब ताहिरहसन अन्सारी हे दोघे त्यांचा हस्तक निकुंज केसरिया (रा. राजकोट, गुजरात) याच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ पानमसाला गुटखा पिंपळवाडी चौक येथील शंतनु पान स्टॉल या पान टपरीमध्ये विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी टिम’ने पिंपळवाडी चौक, शिर्डी येथील पानटपरीमध्ये छापा टाकून टपरीमध्ये असलेला फहाद
ताहिरहसन अन्सारी (वय २६, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, मुळ रा. कोटकादर, ता. नगिणा, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेऊन त्याचे शंतनु पान स्टॉल या नावाचे पानटपरीची झडती घेतली. यावेळी पानटपरीमध्ये ९१ हजार ४७६ रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा, ९ हजार ६८० रुपये किमतीची वि १ सुगंधीत तंबाखु, ७०० रुपये किमतीचा आर.एम.डी. पानमसाला गुटखा, ६०० रुपये किमतीची एम. गोल्ड सुगंधीत तंबाखु, १ हजार ९०० रुपये किमतीचा रजनीगंधा पानमसाला गुटखा, २० हजार रुपये किंमतीचा वन प्लस मोबाईल असा एकूण १ लाख २४ हजार ३५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्याकडे त्याने पानमसाला गुटखा, सुगंधीत तंबाखु गुटखा कोठून आणला याबाबत अधिक विचारपुस करता त्याने पानमसाला गुटखा व सुगंधीत तंबाखू ही निकुंज केसरिया (रा. निर्मला रोड, राजकोट, गुजरात) हा पाठवित असून पानमसाला हा शिर्डी या ठिकाणी आणल्यानंतर शोएब ताहिरहसन अन्सारी (रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, मुळ रा. कोटकादर, ता. नगिणा, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश) हा टपरीमध्ये
आणून विक्री करत असल्याचे सांगितल्याने त्याच्याविरुध्द शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. ३५३/२०२४ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!