शिर्डीत महिलाच्या मदतीने दुचाकी चोरी, ३० दुचाकी हस्तगत ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

शिर्डीत महिलाच्या मदतीने दुचाकी चोरी, ३० दुचाकी हस्तगत ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: महिला साथीदारांच्या मदतीने शिर्डी साईसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी या ठिकाणीहून दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांनी पकडली. या टोळीकडून तब्बल २२ लाख ८२ हजार रुपये किमतीच्या ३० दुचाकी हस्तगत करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे, परंतु या कारवाईनंतर ही शिर्डी परिसरातून दुचाकी चोरी गेल्याच्या घटना घडल्याने चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना चॅलेंजिंग केल्यासारखे आहे. यामुळे पोलिसांच्या पुढील कारवाईकडे शिर्डी परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अन्वर मन्सुर शेख (रा. पानमळा, कोपरगांव, जि. अहमदनगर), बबन धोंडीराम मोगरे (वय ४८, रा. रावळगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक), अंकुश भावसिंग चव्हाण (वय ४२, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, सफौ बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ अतुल लोटके, पोना रविंद्र कर्डीले, पोना गणेश भिंगारदे, पोना संदीप चव्हाण, पोना संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे यांचे ” विशेष पोलीस टिमने ” ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला होता. याबाबत एसपी राकेश ओला यांनी या घटनेकडे गांभीर्याने घेऊन एसपी ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना दुचाकी चोरीतील गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबी टिम’ला सूचना दिल्या होत्या.
पोलीस पथक शिर्डी परिसरामधील चोरीस गेलेल्या दुचाकी ठिकाणाची पाहणी करुन तसेच पोलीस ठाणे अभिलेखाची खात्री करता शिर्डी परिसरामधून विशेषत: होंडा कंपनीच्या जास्त गाड्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्या दृष्टीने अशाप्रकारे गुन्हे करणारे अहमदनगर तसेच आजुबाजुचे जिल्ह्यामधील दुचाकी चोरीमधील आरोपीची माहिती काढत असतांना पोलीसांना माहिती मिळाली की, अन्वर मन्सुर शेख (रा. पानमळा, कोपरगांव) हा चोरीची दुचाकी घेऊन शिर्डी ते कोपरगांव जाणारे रोडवर सावळीविहीर फाटा या ठिकाणी थांबलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी सावळीविहीर परिसरामध्ये सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चोरीचे चोरीचे दुचाकीबाबत विचारपुस करता त्याने तसेच त्याचे इतर साथीदार बबन धोंडीराम मोगरे (वय ४८ रा. रावळगांव, ता. मालेगांव, फरार – शाहीस्ता मन्वरअली सय्यद, (रा. कोपरगांव, ता. कोपरगांव), फरार – माया दिनेश चौधरी (रा. कालिकानगर, शिर्डी, ता. राहाता), अंकुश भावसिंग चव्हाण (वय ४२, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचेसह अहमदनगर, नाशिक, मालेगांव, परभणी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन दुचाकी चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून विविध ठिकाणावरुन २२ लाख ८२ हजार रुपये किमतीच्या ३० दुचाकी काढून दिल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले अन्वर मन्सुर शेख (रा. पानमळा, कोपरगांव, जि. अहमदनगर), बबन धोंडीराम मोगरे (रा. रावळगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक), अंकुश भावसिंग चव्हाण ( रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं.४९८/२०२२ या गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!