शिक्षक बँकेची सभा सभासदांच्या पैशावर वातानुकूलीत बड्या हॉटेल मध्ये होणार : विकास डावखरे


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता शिक्षक बँकेचा स्वत:च्या मालकीचा प्रशस्त हॉल व जागा उपलब्ध असताना केवळ स्वत:च्या चंगळवादी विलासी वृत्तीने सभासदांच्या पैशाच्या उधळपट्टी करण्याच्या उद्देशाने नगर शहरातील बड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्याचा अट्टहास केलेला आहे.
 बँकेच्या सभासदांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी केला आहे.   

तुमचा कारभार जर निष्कलंक आहे तर सभासदांना घाबरून  हॉटेलसारख्या चिरेबंदी वाड्यात सभा आयोजित करण्याचा उद्देश न समजण्यासारखा आहे. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ सभासदांची मुस्कटदाबी करत आवाज दाबण्याचा प्रकार असून हा प्रकार आम्ही सहन करणार नाही.शिक्षक बँकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करून आक्रमकपणे आवाज उठवणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे विकास डावखरे दिली आहे. निष्कलंक कारभाराला घाबरायची गरजच काय? याचाच अर्थ तुमच्या कारभारात गैरव्यवहार झालेला असून मागील सर्वसाधारण सभेच्या भरमसाठ खर्चाचे गैरव्यवहाराचे समर्थन होऊच शकत नाही त्यामुळे सभेची जागा बदलून तुम्ही लोकशाहीचा गळा घोटला असून आता सभासद येणा-या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नसल्याचा घणाघात डावखरे यांनी सत्ताधारी मंडळावर केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!