संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- देशाचा मूळ इतिहास बाजूला करून नव्या पिढीपुढे चुकीचा इतिहास मांडला जाता आहे.ज्या देशाचा इतिहास विसरवला जातो त्या देशाचे भवितव्य धोक्यात असल्याचे मानले जाते. हाच धोका लक्षात आल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार नव्या पिढीच्या भवितव्यासाठी आजही सक्रिया असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी केले.
पाथर्डी येथे हिंदवस्तीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या दरम्यान ऊसतोडणी कामगारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू पाटील बोरूडे, महिला तालुकाध्यक्षा सविता भापकर, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे, किरण शेटे पाटील, वैभव दहिफळे, मुरली दहिफळे, माजी पं.स.सदस्य व्हि.टी.खेडकर, बन्सी आठरे, बाळासाहेब घुले, अनिल ढाकणे, हुमायून आतार, शहराध्यक्ष योगेश रासने, अक्रम आतार, सोमनाथ टेके, उषा जायभाये, रत्नमाला, माजी जि.प.सदस्या योगिता राजळे, उदमले, मनिषा ढाकणे, देवा पवार, राजेंद्र बोरूडे, जालिंदर वामन, गहिनीनाथ शिरसाट, युवकचे तालुकाध्यक्ष महारूद्र किर्तने ,चंद्रकांत भापकर, आरती नि-हाळे, आतिष नि-हाळे, बाळासाहेब गर्जे आदी उपस्थित होते.
श्री ढाकणे म्हणाले, महात्मा गांधींच्या विचारांची गरज आज देशाला आहे.त्याच विचारांना धक्का देण्याचे काम काही शक्तींकडून होत असल्याने शरद पवार याविरोधात लढत आहेत. महाराष्ट्राची आजचची प्रगती ही केवळ पवार साहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम असून सर्व क्षेत्रे व समाजातील सर्व घटकांसाठी त्यांच्याकृडून मागील पन्नास वर्षा काम झालेले आहे. सर्व समाजात एकता व समता या शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या आधारावर पवारांनी महाराष्ट्र बांधला असून यासाठी आपण त्यांना साथ देणे गरजेचे आहे. अन्यथा नव्यापिढीपुढे चुकीचे संदर्भ मांडून देशाची वाटचाल वेगळ्या दिशेनने होईल. येत्या सर्व निवडणूकीत जनतेने पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांना साथ द्यावी व वेगळे मनसुबे बाळगून असणाऱ्यांना धडा शिकवावा. येत्या काही दिवसांत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी निवासी शिबीराचे आयोजन करणार आहे. त्यांचे वैचारिक मोट पक्की केली जाईल. प्रास्तविक पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केले. आभार किरण खेडकर यांनी मानले.