संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- पेट्रोलपंपजवळ उभा असणारे टॅंकरने अचानक पेट घेतला, या दरम्यान पेटलेला टॅंकर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी येऊन विझविल्याने मोठा अनर्थ टळल्याची घटना सोमवारी (दि.23) 4 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी विळद घाट येथे घडली.
याबाबत समजलेले माहिती अशी की,विळद घाट नजिकच्या इंडियन ऑइल या पेट्रोलपंपाजवळील गॅरेजसमोर उभा करण्यात आलेल्या टॅकरने अचानक पेट घेतला होता. या दरम्यान समोरील पेट्रोल पंप कर्मचा-यांना प्रसंगावधान पाहून एमआयडीसी अग्निशमन दलास माहिती दिली. तत्परतेने एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या येऊन पेटलेला टॅकर विझविण्यात यश मिळवल्याने पुढील अनर्थ टाळा. यामुळे इंडियन ऑइल या पेट्रोलपंप कर्मचा-यांना निश्वास सोडला.