विदेशी दारू होम डिलिव्हरी देणारा पकडला ; नगर तालुका पोलिसांची कारवाई


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :-
भोयरे पठार येथे अवैध विदेशी दारू होम डिलिव्हरी देणारा आरोपी दारूच्या बॉक्ससह २२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी पकडला आहे. संपत घमाजी उरमुडे (वय ४९ रा .भोयरे पठार ता. जि . अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोना राहुल शिंदे, मपोहेकॉ प्रमिला गायकवाड, पोहेकॉ जगदीश जंबे,पोना ज्ञानेश्वर खिळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना भोयरे पठार गावात संपत घमाजी उरमुडे हा देशी विदेशी दारु विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी तात्काळ पथकासह सापळा लावला. भोयरे पठार (ता.जि अहमदनगर) ते सारोळा आडवाई जाणारे रोडलगत माळवाडी येथे पायी चालत जावून त्या ठिकाणी खात्री केली. या दरम्यान एकजण त्याच्या घराच्या समोर देशी विदेशी दारुची विक्री करत होता. या ठिकाणी लगेच नगर तालुका पोलीस पथकांनी ८.३० वाजता छापा टाकला. तो व्यक्ती हा त्याच्या हातातील देशी विदेशी दारुच्या बाटल्या या गोणीत भरुन हिरोहोंडा कंपनीची एच एफ डिलक्स (क्र . एम.एच .१६ एजी ६६७८) ही घेऊन पळून जावू लागला. त्यावेळी नगर तालुका पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. तेव्हा त्याच्या ताब्यात ३२४० रुपये किंमतीच्या मॅकडॉल नं . १ रमच्या १८० मिलीच्या २४ सिलबंद बाटल्या, ३८४० रुपये किंमतीच्या मॅकडॉल नं . १ व्हिस्कीच्या १८०1 मिलीच्या २४ सिलबंद बाटल्या, १५ हजार रु किंमतीची हिरो होंडा कंपनीची एचएफ डिलक्स क्र.एम.एच. १६ एजी ६६७८) दुचाकी असा एकूण अंदाजे २२ हजार ८० रुपयांचा मुद्देमालासह आरोपी संपत घमाजी उरमुडे (वय ४९ रा .भोयरे पठार ता. जि . अहमदनगर) याचे कब्जात मिळून आला. नगर तालुका पोलिसांच्या पथकांने तो मुद्देमाल जागीच जप्त करून आरोपी संपत घमाजी उरमुडे याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात मु. प्रो . ॲक्ट कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!