वाळू माफियांनी केली ट्रॅक्टरने चिरडून पोलिसांची हत्या; शिक्षणमंत्री काय म्हटले ते पहा…

वाळू माफियांनी केली ट्रॅक्टरने चिरडून पोलिसांची हत्या; शिक्षणमंत्री काय म्हटले ते पहा…
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाटणा : Bihar Crmie news
बिहारमध्ये वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांना न घाबरता मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खननाची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. या परिस्थितीत बिहारमधील जमुई येथे दि.१४ नोव्हेंबर २०२३ सकाळी गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोपवेलजवळ वाळू माफियांनी एका उपनिरीक्षकाची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची धक्यादायक घटना घडली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले इतर पोलीस जखमी झाले. राज्य पोलीस मुख्यालयाच्या सूचनेवरून जमुई जिल्हा प्रशासनाने आरोपी वाळू माफियांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या प्रकरणी बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी अकलेचे तारे ताडले आहेत. (Bihar Sand mafia kills policemen)


प्रसारमाध्यमांनी या घटनेबद्दल विचारले असता, ही नवीन घटना आहे का? ही घटना पहिल्यांदाच घडली आहे का? यापूर्वी कधीच घडली नाही का? उत्तर प्रदेशात असे घडत नाही का? मध्य प्रदेशात घडत नाही का? ही पहिलीच घटना नाही ना? असे सवाल चंद्रशेखर यांनी उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, गुन्हेगार असतील तर अशा घटना घडतच राहतील. असे वेळोवेळी घडते आणि दोषींना चोख प्रत्युत्तर दिले जाते. गुन्हेगार २४ ते ४८ तासांत तुरुंगात जातात. मात्र असे गुन्हे नवीन नसल्याचा पुनरुच्चार चंद्रशेखर यांनी केला. ्पू्पू्पू्पू्पू्पू्पू््पू्पू््पू्पू््प्पू्पू्पू्पू्पू्पू्पू््पू्पू््पू्पू्

या ्पू्पू्पू्पू्पू्पू्पू्पू््पू््पू्पू््पू

वाळू माफियांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्याची बिहारमधील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही वाळू माफियांकडून अनेक घटना घडल्या आहेत. दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंगेरमध्ये खाण खात्याच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेत हवालदाराला जबर मारहाण करण्यात आली. दि.१ नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये वाळू माफियांनी एका कॉन्स्टेबलची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केली होती. दि.१२ ऑक्टोबरला गया येथे वाळू माफियांच्या हल्ल्यात एका उपनिरीक्षकासह दोन जवान जखमी झाले होते. दि.८ ऑक्टोबर २०२३ रोजी जमुईमध्येच पोलिस तपास पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. दि.१ऑक्टोबर २०२३ रोजी पाटणा येथील मणेर येथे वाळू माफियांनी पोलीस पथकावर गोळीबार केला होता. दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी, वाळू माफियांनी नवादा येथील कादिरगंज येथे खाण पथकावर हल्ला केला आणि एक खाण निरीक्षक आणि एक एसआयपी जवान जखमी केला. दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी गया येथे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. यात एसएचओचे ६ व ४ पोलिस जखमी झाले होते.

वाळू माफियांनी केलेल्या घटनेनंतर जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना ट्वीट केले आहे. त्यांनी ट्विटरमध्ये लिहिले की, ‘मुख्यमंत्री, राज्यात वाळू तस्करांची टोळी वाढत आहे. अशा स्थितीत तुमच्या नेतृत्वावरही प्रश्न पडतो की, हे सर्व तुमच्या संरक्षणाखाली होत आहे का? अन्यथा आजपर्यंत ठोस पावले उचलली का गेली नाहीत? काही ठिकाणी अवैध वाळू उत्खननामुळे नदीत बुडून लोकांचा मृत्यू होत आहे तर, काही ठिकाणी अनियंत्रित वाहने सुरक्षा दलांना चिरडत आहेत. बिहारी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!