श्री संत वामनभाऊ महाराजांचा जन्मोस्तव सप्ताहाचे नियोजन ; चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
१९६५ साली चिंचपूर पांगुळला वामनभाऊंचा सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला होता, त्यानंतर असा कार्यक्रम गावात घेतला जावा, अशी अपेक्षा अनेक गावक-यांची होती. त्यानुसार सर्वांच्या इच्छेखातर मंगळवारी (दि.१९) पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ रामगड येथे बैठक पार पडली. बैठकीत श्री संत वामनभाऊ महाराज यांचा जन्मोस्तव सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे.


त्यानुसार येणाऱ्या वर्षाचे(२०२३)नारळ येत्या शनिवारी( दि.२३) पारगाव (ता.शिरूर का. जि. बीड) या ठिकाणी नारळी सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी घेण्यासाठी घरातील किमान एकजण त्या ठिकाणी जाण्याचे बैठकीत नियोजन ठरले आहे.
याप्रमाणे आगामी काळात होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी नियोजन करण्यासाठी एक किंवा दोन मासिक बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नियोजन करण्याचे ठरले आहे.

संकलन: सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!