वाडिया पार्क येथे संग्राम चषक नगर चॅम्पियन लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

वाडिया पार्क येथे संग्राम चषक नगर चॅम्पियन लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

शहरात चांगले वातावरण निर्माण झाले असून सर्वांच्या योगदानातून चांगले काम उभे राहत आहे : आ. संग्राम जगताप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वाडिया पार्क क्रीडा मैदानाच्या माध्यमातून शहरातील व जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक पर्वणी असते. या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण झाले आहे. या ठिकाणी क्रीडा नगरीचे वातावरण निर्माण होते. आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. नगर शहरात चांगले वातावरण निर्माण झाले असून सर्वांच्या योगदानातून चांगले काम उभे राहत आहे. सातत्याने स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे. या माध्यमातून वातावरण निर्मिती होऊन ऋणानुबंध व गोडवा निर्माण होतो. नगर शहरामध्ये एअरपोर्ट निर्माण होणे गरजेचे असून यासाठी पाठपुरावा करणार आहे. वाडिया पार्क मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चांगले मैदान असून या ठिकाणी आयपीएल आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतात. यासाठी इच्छाशक्तीची खरी गरज आहे. खेळाडूंना येण्यासाठी एअरपोर्टचीही आवश्यकता असते, युवकांनी एकत्रित येऊन सातत्याने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करावे. वैभव ढाकणे व सुनील आगरकर मित्र परिवाराच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून क्रीडा रसिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

वाडिया पार्क येथे संग्राम चषक नगर चॅम्पियन लीग 2023 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते. नगरसेवक विपुल शेटिया, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, सागर मुर्तडकर, केशव नागरगोजे, महेश झोडगे, रामभाऊ घाडगे, दीपक बडे, सचिन सुसे, सुनील झिरपे, संतोष उगले, भरत मामा पवार, अमित खामकर, आप्पा कातोरे, गोरख शेवाळे, आयोजक सुनील आगरकर, प्रकाश राठोड, विशाल तोरणे, राजू बराटे, संजीव आल्हाट आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव ढाकणे म्हणाले की, नगर शहरातील युवकांनी एकत्र येऊन आ. चषक नगर चॅम्पियनशिप लिंक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. खेळाडूंसाठी बक्षिसांची मोठी पर्वणी आहे.


सुनील आगरकर म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून वाडिया पार्क मैदानावर संग्राम चषक नगर चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर खेळली जाणार आहे या स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी झाले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना फोर व्हीलर टू व्हीलर गाडी बक्षीस दिले जाणार असून इतर बक्षिसेही दिली जाणार आहे असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!