👉हुंडेकरी ट्रान्सपोर्ट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – शहरातील वाडिया पार्क मैदानात जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व महावीर ग्रुपच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट २०-२० आमदार चषक स्पर्धेचा मानकरी हुंडेकरी ट्रान्सपोर्ट ठरला काल हुंडेकरी ट्रान्सपोर्ट विरुद्ध पुनीत बालन या संघात झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये हुंडेकरी ट्रान्सपोर्ट संघाने दणदणीत विजय मिळवित आमदार चषक स्पर्धेत आपल्या संघाचे नाव कोरले तर उपविजेता संघ पुणे येथील पुनीत बालन व तृतीय क्रमांक हुंडेकरी मोटर्सने मिळवले.
यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणले की, राज्यस्तरीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले.आमदार चषक स्पर्धा ही तरुणांना प्रोत्साहन देणारी व नवीन पिढीला प्रेरणा देणारी स्पर्धा आहे कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून या स्पर्धेला खंड पडला होता परंतु शासकीय नियमांचे पालन करून खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे होते स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण होत असते, यामधून खेळाडू घडवला जातो व तो पुढे येऊन राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर त्याला खेळण्याची संधी उपलब्ध होते. वडियापार्क येथे लवकरच शासकीय नियमांची पूर्तता करून टॅर्फ व्हीकेटचे मैदान उभारू व खेळाडूंना सर्व सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
वाडियापार्क येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व महावीर ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक २०-२० क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक हुंडेकरी ट्रान्सपोर्टला वितरीत करतांना मा.आमदार अरुणकाका जगताप,आ.संग्राम जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा.माणिकराव विधाते, सचिव गणेश गोंडाळ, महावीर ग्रुपचे संचालक राजेश भंडारी, सुमतीलाल कोठारी, नगरसेवक प्रकाश भागनगरे, नगरसेवक विपुल शेटीया, संजय चोपडा, अर्बन सेलचे अध्यक्ष प्रा.अरविंद शिंदे, क्रिकेटर अनुपम संकलेचा, वसीम हुंडेकरी, उद्धव शिंदे, विनीत म्हस्के, रोहित जैन, अजय कवीटकर, संजय वालेकर, संदिप आडोळे, महेश गोंडाळ, अतुल पलघडमल, संदीप घोडके, सागर घोडके, सुभाष येवले, सुरेश बनसोडे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके म्हणाले की,आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये युवकांनी मैदानी खेळाकडे वळावे,नगर शहरामध्ये राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते मी ही एक खेळाडू आहे. वाडियापार्क मैदानामध्ये क्रिकेट खेळलो आहे आमच्या काळात खेळाडूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते परंतु आजच्या खेळाडूंना सर्व सुविधा मैदानावर उपलब्ध करून दिल्या जातात खेळाडूंनी या संधीचे सोने करावे, कामाच्या व्यापातून वेळ काढून क्रिकेट पाहण्यासाठी मी मैदानात आलो राज्यभरातील खेळाडूनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व प्रेक्षकांची मने जिंकली असे ते म्हणाले.
अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिव्यांग हिंगणेकर यांनी पटकावला, या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज यश जाधव तर उत्कृष्ट गोलंदाज हेरंब परब,मॅन ऑफ द सिरीज नवशाद शेख याने यांनी मिळवले या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.माणिकराव विधाते यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष येवले यांनी मानले तर आभार प्रदर्शन गणेश गोंडाळ यांनी व्यक्त केले.