वर्धमान तरुण मंडळ,खिस्तगल्ली कारंजा तर्फे त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत अल्पोपहार वाटप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – वर्धमान तरुण मंडळ,खिस्तगल्ली कारंजा तर्फे त्र्यंबकेश्वर ,नाशिक येथील निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करून दिंडीचे महाराज यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दिंडीत सहभागी वारक-यांना चिक्की, वेपर्स व लाडू पाकीट या अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळू चंगेडे, उपाध्यक्ष किरण शिंगी, माजी नगरसेवक किशोर बोरा, सल्लागार अतुल भंडारी, प्रवीण कोठारी, बबन चंगेडे, हरिष भाटे, भूषण चंगेडे, श्रेणिक शहा, सुनील गांधी, अभय कोठारी, वस्तूपाल गांधी, संतोष भंडारी, अजय कावरीया, किशोर डागा, अजित गांधी, अक्षय चंगेडे, किशोर फिरोदिया, केतन शिंगी, मनिष चोपडा, कुणाल शिंगी, प्रसन्न खाजगीवाले, निरव भाटे,राजू बूब व सदस्य उपस्थित होते.
सतत गत ४२ वर्षापासून या दिंडीचे स्वागत करण्याची परंपरा कायम असून, कोरोना नंतर दोन वर्षांनी दिंडी निमित्त पुन्हा वारकर्यांच्या भेटीने परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक भारावून गेले.विठ्ठल विठ्ठलच्या गजराने व टाळ मृदुंगाच्या आवाजाने खिस्त गल्ली परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.