वडगाव जि. प. प्रा. शाळेत शाळापूर्व तयारी कार्यक्रम उत्साहात


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमास आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात गावातून फेरी काढून झाली. शाळेत दाखलपात्र मुलांना एक पुस्तक व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांचा सर्वांगीण विकसाकरिता त्यांच्यातील वेगवेगळ्या क्षमता विविध खेळांच्या मदतीने तपासण्यात आल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्री बडे सर यांनी केली तर सूत्रसंचालन श्री माळी सर व आभार प्रदर्शन शिरसाट सर यांनी केले .शेवटी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात झाला.
संकलन : सोमराज बडे (पत्रकार)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!