लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव तर्फे कृषी दिन साजरा

👉कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

कोपरगाव- येथे लायन्स क्लब व लिओ क्लबच्या वतीने स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
लायन्स क्लब व लिओ क्लब आयोजकांनी सत्कार करण्यात आलेले प्रगतशील शेतकरी याप्रमाणे प्रसाद परजणे ( दूध उत्पादक) ,दीपक रक्ताटे ( दूध उत्पादक), भास्कर सुरळकर (शेतीव्यवसाय), बापू सुराळकर (राष्ट्रपती पुरस्कार विजेते), संदीप मालकर (हळद उत्पादक), उमेश लोंढे (कोकमठाण- सोयाबीन उत्पादक), प्रशांत सुरळकर (येसगाव कांदा ऊस उत्पादक) ,संदीप देवकर (टाकळी कांदा उत्पादक), दत्त सुरळकर (येसगाव ऊस उत्पादक), राजू कोल्हे (एसगाव- दूध उत्पादक), राजू निकोले (ऊस उत्पादक) या शेतकऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन आयोजकांनी सत्कार केले.

लायन्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष राम थोरे म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या देशातील 70 टक्के लोक शेती व्यवसाय करतात आणि म्हणून हा शेतीप्रधान देश समजला जातो ,परंतु शेतीप्रधान देश असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा सन्मान दिला जात नाही. आजही शेतीप्रधान शेतकरी राजा विविध समस्यांना तोंड देत आहे. विविध समस्या असताना सुद्धा काही शेतकरी या कठीण प्रसंगी ,अडचणींमध्ये आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम करून देशाला एक नवीन दिशा देत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान आहे. या उद्देशाने लायन्स क्लब, लिओ क्लबने प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान कृषी दिनानिमित्त केला आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स क्लब सेक्रेटरी अक्षय गिरमे, ट्रेझरर सुमित भट्टड, लिओ अध्यक्ष आदित्य गुजराथी, सेक्रेटरी पृथ्वी शिंदे, मनन ठोळे,सम्यक गंगवाल, प्रोजेक्ट चेअरमन सुरेश शिंदे
ज्ञानेश्वर थोरे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!