विठ्ठल व डॉ. मीना यांनी जपले सामाजिक भान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राज्यात हजारोंच्या संख्येने होणारे बालविवाह त्यातून बालपण हरवून बालमाता होण्याचे प्रमाण लक्षनीय असतांनाही प्रशासन मात्र धिम्म आहे. केंद्र सरकारच्या तपासणीत राज्यात बालविवाहाचे प्रमाण 22 टक्क्याच्या वर आहे दिसून आले आहे. मराठवाड्यात तर ते 37 टक्क्याच्या आसपास आहे, तर बालमाता होण्याचे प्रमाण 15 टक्क्याच्या आसपास असतानाही सरकार दरबारी काहीही सोयरसुतक नाही. ह्या बालविवाहित मुलींचं शिक्षण थांबून बालपण हेरावल जात असतांना यंत्रणा मात्र सुस्त आहे.
त्यासाठी बालकांसाठी काम करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची मदत घेतली जात आहे. कागदपत्री तयारी झाली असली तरी निधीच्या कमतरतेमुळे काम अडले आहे.
विठ्ठल बडे हे वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत आहेत. तर डॉ. मीना ह्या नवी मुंबई महानगर पालिकेत वैद्यकीय अधिकारी आहेत. लग्नाचा वाढदिवसाचा खर्च टाळत जोडप्याने जनहित याचिकेसाठी ११ हजार रुपये मदत करून सामाजिक भान जपले आहे. याकामी अधिक मदतीची गरज असून त्यांनी मदतीसाठी आव्हान केले आहे. मागील वर्षीही लग्नानिमित्त त्यांनी एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांनासाठी मुख्यमंत्री मदत निधीला दिले होते.
👉मदतीसाठी संपर्क क्रमांक 9604867977.