लंके सोडून दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु मी त्यांचे ऐकले नाही. ; शरद पवारांचा गौप्यस्फोट

लंके सोडून दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु मी त्यांचे ऐकले नाही. ; शरद पवारांचा गौप्यस्फोट
स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : त्यांनी एकास माझ्याकडे मध्यस्थीसाठी पाठविण्यात आले होते. निलेश लंके सोडून कुणाला दुसऱ्यास उमेदवारी द्या, असे त्यांचे म्हणणे होते. पण मी त्यांचे ऐकले नाही. यावरून लक्षात येते की, विखे बाप-लेकाची निलेश लंकेंमुळे झोप उडाली असून, ते लंकेंना किती घाबरलेत हे दिसते, असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सर्वोसर्वो शरद पवार यांनी केला.
दक्षिण अ.नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोपाप्रसंगी शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी गांधी मैदान येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर, माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ॲड प्रतापकाका ढाकणे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
श्री पवार म्हणाले, आपला उमेदवार हिरा असून, तो या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न नक्कीच प्रभावीपणे मांडील. त्यांना भाषेची कोणतीही अडचण येणार नाही. विखे पिता-पुत्रांना आत्मविश्वास नाही. ते या पक्षातून त्या पक्षात फिरत असतात. लंके यांच्याकडे संपत्ती नाही, परंतु माणुसकी आणि लोकप्रेमाचा खजिना आहे.

थोरात म्हणाले, पालकमंत्री आपल्या दिवट्या पुत्राने काय काम केले. हे सांगण्यापेक्षा पवार साहेब आणि माझ्यावर टीका करीत आहेत. ते कनोली, मनोली, कनकापूरलाच फिरतात. कारखाने, संस्था चालवायला घेतल्या, पण त्यातही घोटाळे घातले. लोकांचे पैसे दिले नाही. पाच वर्षे गडी दिसलाच नाही. दिल्लीला जाऊन मजा- हजा केली. आता लोकांत मंतासाठी दहशत करीत आहेत.


युवानेते श्री ठाकरे म्हणाले की, भाजपने कोणतेच काम केले नाही. त्यांनी सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवले. पुत्र प्रेमासाठी आमचे पक्ष फुटल्याचे सांगतात. पण त्यांनी पुत्रप्रेमासाठी वर्ल्डकपची फायनला गुजरातला नेली. लंके यांना आमचे शिवसैनिक अनिलभैयांची कमी पडू देणार नाहीत.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!